कोळी बांधवांसाठी जेट्टीची मंजुरी; पालकमंत्र्यांनी शब्द पाळला

म्हसळा : निकेश कोकचा

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी जेट्टीच्या विकासासाठी चौदा कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मच्छि उतरवायला जेट्टी बांधण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या पाठपुराव्याने दिघी कोळीवासीयांसाठी नवीन जेट्टी मंजूर झाली आहे. 
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी जेट्टीच्या विकासासाठी चौदा कोटी चाळीस लाखांचा निधी मंजूर

दिघी येथील जेट्टीचे बांधकाम (30 x 10 मी) असणार आहे. बोट यार्ड ( 390 x 30 मी) असेल. उतरता धक्का (20 x 10) असून सोबत जोडरस्ता, सौर ऊर्जा दिवे, पंप गृह व पाण्याची व्यवस्था म्हणून विंधन विहीर असे बांधकामाचे स्वरूप असणार आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी  18 जानेवारी 2018 रोजी दिघी गावाच्या भेटी दरम्यान नूतन जेट्टी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी जेट्टी संदर्भात प्रस्ताव मंत्रीमहोदयांना दिला होता. त्यावेळी मंत्रीमहोदयांनी ग्रामस्थांना वचन दिले जो पर्यंत जेट्टीचे काम होत नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही. आणि बोलल्या प्रमाणे जेट्टी कामात मंत्रीमहोदयांनी यश मिळवले.

कोंकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुविधायुक्त मासेमारी बंदरांची मात्र, कोकणात कमी आहे. रायगड जिल्ह्य़ाला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे पण संपुर्ण जिल्ह्य़ात एकही सुसज्ज मासेमारी बंदर उपलब्ध नाही व त्यामुळे श्रीवर्धन, दिघी ते मुरुडपासूनच्या मच्छीमारांना मासेविक्रीसाठी मुंबईतील बंदरापर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे. याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसत आहे. जेटीअभावी समुद्रकिनारी मासळी उतरवताना व बोटीत डिझेल, बर्फ चढवताना मच्छीमारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मासळी तर पाण्यातील दगडावर उतरवली जाते. त्यामुळे गेली अनेक वर्षे मच्छीमारी बोटींसाठी जेटी बांधावी, अशी मागणी इथले मच्छीमार करीत आहेत; मात्र, त्याला आता मंजुरी मिळाली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला.  येथील मोडक्या स्थितितील जेटीमुळे समुद्रातुन आणलेल्या मच्छीला उतरवायला जागा मिळत नाही. उशिर झाला तर मच्छी खराब होउन अतिशय कमी भावात विकावी लागत असल्याची  प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान, दिघी बंदराचे संरक्षण करणारी ब्रेकवॉटर वॉल दिवसेंदिवस ढासळत आहे. पावसाळ्यातील उधाणाने त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात लाटांच्या तडाख्यामुळे ती आणखी उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता असते. अर्धीअधिक भिंत तुटल्यामुळे समुद्राच्या उधाणाच्या लाटा बंदरात घुसण्याची भीती मच्छीमारांना आहे.  त्यामुळे जेट्टी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत