कोव्हिड रुग्णालय तयार करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित येण्याची गरज; सागर शेळकेंचे जनतेला आवाहन

कर्जत : अजय गायकवाड

कोरोनाला हरवण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येवून उपाय योजना करण्याची हीच वेळ असून, सध्याच्या घडीला तालुक्यात कोरोना रुग्णासाठी कोव्हिड हॉस्पिटल तयार करण्यासाठी उपाय योजना केली जाणे अत्यावश्यक आहे. असे अवाहन कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी येथील जनतेला केले आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तर दुसऱ्या लाटेत कर्जत तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनामुळे अनेक जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. कोरोनाच्या या वाढत्या आकडेवारीमुळे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालय तसेच आवश्यक सुखसोई उपलब्ध होताना दिसत नाहीत. परिणामी कोरोनाचे रुग्ण दगवल्याचे चित्र समोर येत आहेत. तालुक्यात एका दिवसात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याने आता पर्यंतच्या आकडेवारीत रेकोर्ड ब्रेक केला. त्यामुळे नागरिकांत कोरोनाने आणखी दहशत पसरवली असल्याचे चित्र आहे.

तर तालुक्यात सध्या दुर्गम भागात कोरोनाने हात पाय पसरावलेले चित्र डोळ्यासमोर असल्याने अशा गोर गरीब जनतेचा उपचाराचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्व राजकीय नेते मंडळींनी व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येण्याची हीच वेळ असून आपले राजकीय हेवे दावे दूर सारून कोव्हिड रुग्णालयासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी महाराष्ट्र NEWS 24 च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याच्या आवाहनाला तालुक्यातील राजकीय नेते मंडळी एकत्र येऊन साथ देणार का..? हे देखील पहाणे आता महत्वाचं ठरणार आहे.

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत