क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात गंभीर जखमी

पालघर :रायगड माझा 

 भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे आई-वडील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पालघरमध्ये बाईक घसरुन झालेल्या अपघातात दोघं जण जखमी झाले आहेत. ठाकूर कुटुंबीय पालघरमधील माहिम गावचे रहिवासी आहेत. शार्दुलच्या आई हंसा ठाकूर आणि वडील नरेंद्र ठाकूर पालघर अल्याळीमध्ये एका लग्न समारंभाला गेले होते. लग्नानंतर माहिमच्या दिशेने येताना त्यांना अपघात झाला.

दोघांना पालघरमधील ढवळे रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आलं. त्यानंतर वडिलांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलं. शार्दुल सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघातून खेळत आहे. शार्दुलने आतापर्यंत रणजी, आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत