क्रेनची धडक, दुचाकीवरील तीन तरुणींचा मृत्यू

नागपूर : रायगड माझा वृत्त 

नागपूरमधील अंबाझरी टी पॉईंटवर भीषण अपघात झाला. क्रेनने दुचाकीला धडक दिल्याने कॉलेजला जाणाऱ्या तीन तरुणींचा मृत्यू झाला. आज सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

श्रुती बनवारी, स्नेहा अंबाडकर आणि रुचिका बोरीकर असं मृत तरुणींची नावं असून त्या रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.अंबाझरी टी पॉईंट इथे मेट्रोचं काम सुरु आहे. या कामामुळे आजूबाजूचा परिसर अरुंद झाला असून रस्त्यावर खड्डेही प्रचंड झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे असलेली क्रेन क्लिनरशिवाय रिव्हर्स येत होती. तर तीन तरुणी अॅक्टिव्हावरुन ट्रिपल सीट येत होत्या.यावेळी वेगाने मागे आलेल्या क्रेनने अॅटिव्हाला जोरदार धडक दिली आणि तिन्ही तरुणी क्रेनच्या खाली आल्या. यात अॅक्टिव्हावरील दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर एका तरुणीने वोकहार्ट रुग्णालयात प्राण सोडले. पोलिस घटनास्थळी दाखल असून, त्यांनी क्रेन ताब्यात घेतली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत