खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण!

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर इथल्या सेक्टर 4 इथे नवीन हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली आहे.

आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक इस्माईल शेख यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह इस्माईल यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना आणि कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात भाजप नगरसेवक शत्रुघ्न काकडे, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार अशा दहा जणांवर खंडणी मागणं, मारहाण करणं असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शत्रुघ्न काकडे फरार आहेत.खारघरमध्ये अशाप्रकारे गावगुंडांचा त्रास व्यावसायिकांना होत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत