खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेसचा अपघात, बोगी रुळावरून घसली; रेल्वे वाहतुक विस्कळीत

पुणे :रायगड माझा

मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा घसरून अपघात झाला. शुक्रवारी (6 जुलै) पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. घसरलेली बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डाऊन लाईन पूर्णपणे बंद असल्यामुळे मिडल लाईन वरून वाहतूक सुरू आहे. सर्व गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत.

पुण्याच्या दिशने येणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत होती, तेवढ्यात गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक डब्याला बसली. त्यामुळे हा अपघात झाला. बोगीचे प्रचंड नुकसान झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या गाड्या रद्द…
>पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
> पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
> पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल
> भुसावळ पुणे एक्स्प्रेस
>पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत