खनिज तेलाच्या भावात घसरण

रायगड माझा वृत्त :

टोकियो – खनिज तेलाच्या भावातील घसरण मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरूच राहिली. जागतिक पातळीवर तेल पुरवठ्यातील अडथळे दूर होण्याच्या शक्‍यतेने भावात घसरण नोंदविण्यात आली. खनिज तेलाचा ब्रेंटचा भाव आज प्रतिबॅरल ७१.७२ डॉलरवर आला. भावात सोमवारपासून ४.३ टक्के घसरण झाली आहे. 

नॉर्वेत खनिज तेल क्षेत्रातील कामगारांचा संप सुरू असून, याचा फारसा परिणाम नॉर्वेतील खनिज तेल उत्पादनावर अद्याप झालेला नाही. हा संप मागील मंगळवारपासून सुरू असून, तो आणखी काळ चालल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत