खराडीजवळ नदीपात्रात आढळले नवजात अर्भक

रायगड माझा वृत्त 

पुणे – खराडी भागात सोमवारी नदीच्या पात्रात एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक आढळून आले. सकाळी 9 वाजता वॉटर फ्रुंट सोसायटीच्या पाठीमागील मुळा-मुठा नदीच्या पात्रात सिमेंटच्या भिंतीलगत हे अर्भक आढळून आले आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार कैलास लांडे यांनी चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणीतरी नैतिक अथवा अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले हे अर्भक विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने टाकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. राजपूत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत