खळबळजनक; दिल्लीत एका घरात 11 मृतदेह आढळले!

 

नवी दिल्ली : रायगड माझा 

दिल्लीमध्ये बुराडी येथील संत नगरमध्ये रविवारी सकाळी एकाच घरात ११ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ११ मृतदेहांपैकी ७ मृतदेह महिलांचे आणि ४ पुरुषांचे असल्याची माहिती आहे. या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली की कोणी त्यांची हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  मृत्यू झालेले सर्व जण दोन भावांच्या कुटुंबातले आहेत. ११ पैकी १० मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते व त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. तर एक मृतदेह जमिनीवर पडलेला होता.

दोन कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अद्याप आत्महत्या की हत्या याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. ज्या परिसरात हे मृतदेह सापडले आहेत, तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सकाळीच अशा प्रकारची घटना समोर आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत