खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक 

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार 

श्रीवर्धन मध्ये खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या चोरांना अटक केल्याची घटना शनिवारी, ता 15 रोजी श्रीवर्धन येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात अत्यंत दुर्मिळ असणारे ‘खवल्या मांजर’ हे बेकायदेशीररीत्या विक्री करण्यास घेऊन येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जे ए शेख यांना मिळालेली. त्यानुसार पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वळसंग यांची टीम घटनास्थळी रवाना झालेली. बातमी खात्रीपूर्वक असल्याने आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले. श्रीवर्धन मधील वाळवटी येथे असलेल्या श्रीवर्धन – शेखाडी मार्गावरील नझफ अराई यांच्या डॅनियल फार्म हाऊस येथे सापळा रचला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत श्रीवर्धन मधील फैजल अब्दुल अजीज काळोख, निलेश अनंत कर्नेकर, अशोक दर्गे, किशोर महादेव मोहिते यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून तब्बल 80,00,000/- रुपये किमतीचे दोन  “खवल्या मांजर (इंडियन पॅगोलिन)”  प्रजातीचे सस्तन  वन्य जीव ताब्यात घेतले. खवल्या मांजर हे संरक्षण अधिनियम सन 1972 अंतर्गत संरक्षित वर्ग 1 मधील प्राणी आहेत.

 

पुढील तपास वनविभागाकडे – 

दोन्ही “खवल्या मांजर’ आणि आरोपी यांना पुढील कार्यवाही करिता वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेले असून वन विभाकडून कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  कर्करोगासारख्या आजारावर खवल्यांपासून तयार केलल्या औषधाचा वापर केला जातो, असा समज आहे. या चोरांनी कोणासाठी या वन्यप्राण्याची तस्करी केली याचा शोध सुरू आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत