खांदा वसाहत परिसरातून 3 इसमांना अग्नीशस्त्रासह मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने केले गजाआड

पनवेल : साहिल रेळेकर (प्रतिनिधी)

खांदा वसाहत परिसरातून तीन इसमांना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास १ लाख ५ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुकत, डॉ.जय जाधव, पोलीस सह आयुकत, नवी मुंबई, यांनी पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्‍या इसमांविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेचे अति.पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील, पोलीस उप आयुकत प्रविणकुमार पाटील, सहा. पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली विनापरवाना बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र जवळ बाळगणार्‍या इसमांवर काखाई करण्याची मोहीम सुरू केली.

दरम्यान पोना/210 किरण राउत,मध्यवर्ती कक्ष,गुन्हेशाखा नवी मुंबई यांना मिळालेल्या खात्रिशिर बातमीवरून मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखेचे सपोनि एन.बी.तांबे व पथक यांनी खांदा वसाहत, से.नं.13 रिध्दी कॉम्पलेक्स समोरील रोडवर ता. पनवेल जि.रायगड याठिकाणी सापळा लावुन इसम नामे अभिजीत संभाजी पवार वय 28 वर्षे धंदा नोकरी रा. ई-203, ओम शिवा कॉम्पलेक्स, सुकापुर ता.पनवेल जि.रायगड मुळ रा.वरूडेवाफ गाव ता, राजगुरूनगर जि.पुणे, कासिम अब्दुल कलाम वय 38 वर्षे धंदा स्वयंपाकी रा.ए-वन बिर्याणी दुकान, 3 टाईप,बांठीया शाळेजवळ नविन पनवेल ता.पनवेल जि.रायगड मुळ रा. रा.नरहरगौडा, पो.लखानोवडी, ता.महशी जि.बैरईच राज्य उत्तर प्रदेश यांना ऍक्टीव्हा 4जी क्र. एमएच 46/बीएफ/6063 या गाडीसह ताब्यात घेतले.

सदर दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता अभिजीत संभाजी पवार यांचे जवळ विनापरवाना बेकायदेशिर देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जीवंत काडतुसे मिळुन आले. सदर इमसाकडे कसुन तपास केला असता त्यांनी अग्निशस्त्र हे रोहित मनोहर पवार वय 25 वर्षे धंदा नोकरी रा.एच-202 ओम शिवा कॉम्पलेक्स, सुकापुर ता.पनवेल जि.रायगड यांच्याकडुन घेतल्याचे सांगितल्याने रोहित पवार यास मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखा येथे आणुन नमुद गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने नमुद तीन्ही इसमां विरुध्द खांदेश्‍वर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियमचे कलम 3, 25 सह महाराष्ट् पोलीस अधिनियमचे कलम 37(1), 137 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

सदर तीन्ही आरोपीच्या ताब्यातुन देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, ऑक्टीव्हा 4 जी वाहन,रोख रक्कम व इतर साहित्य असे एकुण 1,05,600/- एकुण किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आहे. सदर इसमाकडे त्यांनी अग्निशस्त्र कोणाकडुन घेतले अगर यापुर्वी देखील अश्याप्रकारचे किती अग्निशस्त्र विकत घेवुन कोणाला दिले आहे, अगर कसे? तसेच यामध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा पुढील तपास सपोनि/तांबे, मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा हे करत आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी नवी मुंबई गुन्हे शाखा, मध्यवर्ती कक्षाचे वपोनि,एन.बी. कोल्हटकर,सहा. पोलीस निरीक्षक, निलेश तांबे, पोहवा/नितीन जगताप, पोहवा/शशिकांत शेंडगे, पोना/किरण राउत, पोना/सचिन धनवटे, पोना/सचिन टिके, पोशि/रूपेश कोळी यांनी, केलेली. आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा हे करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत