खातेवाटपाबाबत राष्ट्रवादीची नाराजी उघड; जयंत पाटलांनी केले ट्विट 

महाराष्ट्र News 24 वृत्त

मागील अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या मंत्रीपद खातेवाटपाला अखेर गुरुवारी मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडे अर्थ, काँग्रेसकडे महसूल आणि शिवसेनेकडे गृहखाते नगरविकास गेले आहे. मात्र सध्या झालेले खातेवाटप तात्पुरते असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे या खातेवाटपात पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. 

 

राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप गुरुवारी जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात शिवसेना आणि काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला कमी महत्वाची खाती मिळाल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. मात्र हे खाते वाटप तात्पुरत्या स्वरुपाचे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच यथोचीत खातेवाटप होईल, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

येत्या 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या शपथविधीपासून सर्वच मंत्री खात्यावाचून मंत्री होते. अखेर या मंत्र्यांना खाती मिळाली आहेत. खातेवाटप झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या खातेवाटपासंदर्भातील ट्विटमुळे ते नाराज आहेत, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ट्विटमुळे नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे हे खातेवाटप असे राहिले तरी आणि  बदलले तरी आघाडी सरकारमधेय अंतर्विरोध सुरु होणार हे मात्र नक्की.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत