खामगावात ‘कबड्डी’चा वाद शिगेला, वाहनांच्या जाळपोळीसहीत दगडफेक

(रायगड माझा ऑनलाईन| खामगाव

खामगावात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी ( 23 फेब्रुवारी ) उशीरा रात्री शहरातील शिवाजी नगर आणि सतीफैल भागात दोन वाहने पेटवण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली.
शहरातील  शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळाडूच्या प्रोत्साहनावरून वाद झाला होता. या  वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले होते. तर  १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

बुधवारी ( 21 फेब्रुवारी ) सायंकाळपासून या भागात सतीफैल विरुद्ध शिवाजी फैल असा सामना रंगत असून, गुरूवारी (22 फेब्रुवारी) रात्री ९.३० वाजता दोन्ही फैल समोरा-समोर झाले. कबड्डीच्या वादाची धुसफूस कायम असल्याने, या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यु.के. जाधव यांची बदली झाली.

 त्यानंतर नवीन ठाणेदार संतोष ताले पदभार घेण्यापूर्वीच या भागात कबड्डीच्या वादातून दोन वाहने जाळण्यात आली. यामध्ये ऑटोचा व एका नव्या को-या डस्टर कारचा समावेश आहे.  जाळण्यात आलेला ऑटो रेखा प्लॉट भागातील शिनगारे यांचा असून, कार ही तानाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष तोडकर यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकाच समुदायातील दोन गट लहान-सहान गोष्टीवरून कुरापती उकरून काढत असल्याची चर्चा परिसरात आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत