खालापुरात निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम; राजकीय मंडळीची प्रतिष्ठा पणाला 

खोपोली : समाधान दिसले 

खालापूर तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील तीन ग्रामपंचायतीची निवडणूक 26 सप्टेंबर रोजी होत असल्याने या तिन्ही पंचायती राजकीय मंडळीने प्रतिष्ठीच्या केल्याने आगामी निवडणुकीमुळे गावपातळीवरील वातावरण गणपती उत्सवातच वातावरण गरम होणार आहे, तर अचानक तारीख जाहीर झाल्याने उमेदवाराची मोठी तारांबल उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असल्याने वरीष्ठ पातळीवरून सूत्र हाताळणार असल्याचे चित्र आहे.

खालापूर तालुक्यात आगामी होणाऱ्या पंचायतीच्या निवडणूकित थेट सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीसाठी दिग्गजांनी तयारी केली असली, तरी मात्र हम भी कूच कम नही या उद्देशाने सर्वच उमेदवार तयारीला लागले आहेत. तसेच तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी नावंढे, वडगाव तसेच कलोते मोकाशी या तीन पंचायतीचा समावेश असून नावंढे पंचायतमध्ये 11 सदस्य व थेट सरपंच, तर वडगाव 17 सदस्य व थेट सरपंच आणि कलोते मोकाशी पंचायती मध्ये 11 सदस्य तर थेट सरपंच निवडले जाणार असल्याने मोठी चुरस पाहवयास मिळणार आहे.

वडगाव व नावंढे ग्रामपंचायती मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा तर कलोते मोकाशी येथे शिवसेना राष्ट्रवादी व भाजप अशी लढत होणार असल्याचे चित्र असून या तिन्ही पंचायतीमध्ये राजकीय पक्षाची बलाढय व धनांढय मंडळी असल्याने गावपातलीवरील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र सध्या दोन पंचायती शिवसेनेकडे तर एक पंचायत राष्ट्रवादी कडे आहेत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत