खालापुरात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांच्या विविध गुणांचे दर्शन


खोपोली : समाधान दिसले

महिला आर्थिक विकास महामंडळ अंर्तगत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र द्वारा ग्रामसंस्था महीला बचत गट खालापुर येथे सावित्रीबाई फुले जंयती व महिला हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खालापूर सह परिसरातील महिलांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावून सौभाग्याचे लेन हळदी कुंकवाचा वाण स्वीकारून आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन आपल्यातील गुण सादर केले. यावेळी बदलत्या युगात वावरत असताना महिलांनी अत्याचाराच्या दडपणाखाली न राहता त्याला सक्षम पणे सामोरे जाण्याची ताकत प्रत्येक महिलेमध्ये आली पाहिजे व अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असा संदेश हेमाताई चिंबुलकर यांनी यावेळी शेकडो महिलांना दिला. याप्रसंगी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मनोदय व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे उदघाटन सबरजिस्टरचे विनोद वैध यांनी दिप प्रजवलन करुन कार्यक्रमची सुरवात केली. त्याच प्रमाणे विविध संस्कृती व महीलाच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. फँन्सी ड्रेस, चमचा लिबुं, मेणबत्ती माचीस काडीवर पेटवणे व  संगित खुर्चीसह आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले, या स्पर्धेत यशस्वी झालेल्या आमृता जाधव, रेश्मी वाघमारे, योजना पाटील, जागृती लोते, सुजाता चाळके, सवीता कदम,  आम्रपाली लोंकरे, समीक्षा जगताप, शोभा वाघमारे, रिधीमा गायकवाड, रेखा गायकवाड या महिलांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आ.ले या स्पर्धेचे परिवेक्षक म्हणून क्षमाताई आठवले व सौ.गांवड  यांनी काम पाहिले.
यावेळी खालापुर ग्रामस्ंस्था अध्यक्ष हेमलता चिबुंळकर, उप अध्यक्ष विजया पाटील, सचिव सविता कदम तसेच कमीटी सदस्य मंजुळा कदम, दिपाली वाघमारे, आनिता गायकवाड, योजना पाटील, रुपाली बोदांडे, मनीषा पवार, प्रिया पटेल, मंगलाताई ठोबंरे, साक्षी लोते यांनी कार्यक्रमचे आयोजन केले, त्याच प्रकारे लेखाधिकारी माधुरी मँडम व्यवस्थापक पदमावती गायकवाड, अध्यक्ष मीराताई थोरवे, सचिव सवीताताई मोरे याच्या उपस्थितिती हेमाताई चिंबुळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना साध्य परिस्थितीत महिलांवरील होणारे अत्याचार वाढतेच आहे. बदलत्या युगात वावरत असलो तरी अत्याचाराला थारा देऊ नका असा सल्ला देत कोणत्याही दडपणा खाली न राहता या विरोधात स्पष्टपणे विरोध करण्याची क्षमता प्रत्येक महिलेमध्ये असली पाहिजे असे परखड मत व्यक्त करून महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला स्वताच्या पायावर उभी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे चिंबुळकर यांनी सांगितले. या भव्यदिव्य कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केले होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत