खालापूरमध्ये पोषण आहार घोटाळा उघडकीस

(खालापूर-मनोज कळमकर)

शासनाकड़ून देण्यात येत असलेल्या पोषक आहाराच्या वजनाच्या मापात पाप करून पुरवठा करणा-या स्वयंसिद्धा महिला बचत गटाच्या वंदना सांळुखे व बचतगट पदाधिकारी विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उड़ाली आहे. 
शासनाकड़ून देण्यात येत असलेल्या पोषक आहार सुकड़ी पुरवठा करण्याचा खालापूर तालुक्यात चौक हद्दीतील तुपगाव येथील स्वयंसिद्धा महिला बचत गटाकड़े आहे. तुपगाव येथील कारखान्यात गरोदर व स्तनदा महिला व बालकांसाठी पुरविण्यात येणारा पोषण आहाराच्या पिशवीत सिलबंद करण्यात येवून नंतर पुरवठा करण्यात येतो.परंतु शासना ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी वजनाच्या पोषण आहार पिशवित सिलबंद केला जात असल्याची माहिती खालापूर पंचायत समिती सभापती श्रद्धा साखरे यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सभापती साखरे,ऊपसभापती विश्वनाथ पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी पोळ, सुमित खेड़ेकर,एकात्मिक बालविकासचे चांदेकर यांनी खालापूर पोलीस निरिक्षक जेए शेख,सपोनी शेलार यांच्या मदतीने तुपगाव येथील कारखान्यात छापा मारला.त्यावेळी त्याठिकाणी पोषण आहाराची 1468पाकिटे जवळपास चाळीस टक्के कमी वजनाची भरलेली आढळली.पोलीसानी 57,100रूपयांचा माल जप्त केला आहे.सभापती श्रद्धा साखरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वंदना सांळुखे व स्वयंसिद्धा बचतगटाचे पदाधिकारी यांचे विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे ६० ते ६५ लाखांचा पोषण आहार घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत असून आठवड़्यापूर्वी मनसे खालापूर तालुकाध्यक्ष महेश सोगे यांनी पोषण आहार घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. त्याची सभापतीनी दखल घेतल्यामुळे पोषण घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत