खालापूरात अपघातानंतर गतिरोधकावर पांढरे पट्टे.

खालापूर – मनोज कळमकर

गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे स्पोर्टस बाईक घसरून नौझेर जमशेद आगा(वय 76,रा.नेपियन्सी रोड़ मुंबई)यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी खालापूर नजीक घड़ली होती. नौझेर यांचा अपघातापूर्वी दोन दिवस अगोदर घोड़वली ग्रामस्थांच्या मागणीमुळे गतिरोधक बसविण्यात आला होता.गतिरोधकावर ड़ांबराचा थर असल्यामुळे वाहनचालकाना सावधगिरीची सूचना म्हणून अवश्यक असलेले पांढरे पट्टे मारण्याचे काम शिल्लक होते.परंतु दुर्देवाने उद्योजक असलेले नौझेर आगा यांना गतिरोधकाचा अंदाज न आल्यामुळे दुचाकि अनियंञियत होवून जीवघेणा अपघात घड़ला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत