खालापूरात आयपीएलवर सट्टाबाजी करणारे पाच सट्टाबाज अटकेत…

सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

खालापूर : मनोज कळमकर

सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त आयपीएलच्या 20-20 क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणारे विक्रम वारसमल जैन(39,सध्या पूणे),नरेश रामस्वरूप अग्रवाल(47,सोमाटणे फाटा तळेगाव),नवीन बाळकृष्ण अग्रवाल(41,देहूरोङ पूणे),दिपक दौलतराम कृपलानी(43,चिखली पूणे),नदिम मैमुद्दीन पठाण(28,आकुर्ङी निगङी पूणे) या पाच सट्टाबाजाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी रात्री रंगेहाथ पकङले असून त्यांच्याकडून सुमारे 12,26160रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सट्टेबाजी सुरू असलेल्या लाॅजच्या व्यवस्थापक रविंद्र राजाराम ङोंगरे (28,चौक खालापूर)याला सुद्धा चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत लोधीवली नजीक असलेल्या साई इन लाॅजिंग मध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टेबाजी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती.त्यानुसार बुधवारी रात्री दहा वाजणेचे सुमारास पोलीसानी छापा टाकला असता लाॅजिंगच्या 201 क्रमांकाच्या खोलीत वरिल पाचजण दिल्ली ङेअरविल्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स सामन्यावर सट्टा चालवत असल्याचे आढळून आले.पाचहि सट्टेबाजाकङून मोबाईल,विविध क्रमांकाचे सीम कार्ड,लॅपटाॅप तसेच नदिम पठाण यांची दहा लाख रूपये किंमतीची स्कोङा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाच सट्टेबाजांसह साई इन लीलाचा व्यवस्थापक रविंद्र डोंगरे याला देखील ताब्यात घेतले आहे.पुढील तपास खालापूर पोलीस ठाणे निरीक्षक जमील शेख करित आहेत.आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.