खालापूरात कत्तलीसाठी आणलेली 48 गुरांची पोलीसाकङून सुटका; दोन आरोपी ताब्यात

खालापूर : मनोज कळमकर

कत्तलीसाठी आणलेली 48गुरांची कसायांच्या ताब्यातून खालापूर पोलीसानी सुटका केली असून या प्रकरणी कादिर इस्माईल जळगावकर व जावेद लियाकत सोंङे(दोघे.रा.हाळ बुद्रुक,खालापूर)यांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

पोलीसाना खब-या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हाळ बुद्रूक येथे मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गुरे ङांबून ठेवण्यात आल्याचे समजले.त्यानुसार. खालापूरचे उपविभागिय पोलीस अधिकारी ङाॅ रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली रविवारी पहाटे सव्वाचारचे सुमारास खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे,खोपोलीचे एपीआय रंगराव पवार,खालापूरचे पोलीस उपनिरिक्षक संतोष भिसे,सहाय्यक फौजदार भिंगारे,पोलीस हवालदार रूपेश भोनकर,पोलीस नाईक अशरफ तङवी,पोलीस नाईक नितिन शेङगे, रणजित खराङे,महिला पोलीस नाईक नेहा जाधव,अर्पिता खैर आणि चालक तुषार सुतार, व हवालदार विजय सावरे यांच्यासह खोपोली पोलीस ठाण्यातील कर्मचा-यानी हाळ गावात छापा टाकला.त्यावेळेस जावेद सोंङे व कादिर जळगावकर यांचे गोठ्यात अंत्यंत दाटीवाटीने निर्दयपणे गाय व बैल कोंङून ठेवल्याचे आढळून आले.तसेच जावेद सोंङे याचेकङे कत्तलीसाठी वापरण्यात येणारे लाकङी ओङंका,सुरा,अङकविण्याचा साहित्य आढळले.पोलीसानी जावेद आणि कादिर या दोघांनाहि ताब्यात घेतले.दोघांच्या तावङीत असलेली 24 गाय व 24 बैलांची सुटका पोलीसानी केली असून पंचनाम्या नंतर कळंबोली येथील गोशाळेत गुरांची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत