खालापूरात चालत्या बसमधून धूर.सुदैवाने दुर्घटना टळली.

खालापूर – मनोज कळमकर 
खोपोली नगर परिषदेच्या परिवहन सेवा देणा-या बस मधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येवू लागल्यामुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली होती परंतु चालकाने प्रसंगावधान राखत बस साईङपट्टी वर ऊभी करित सर्व प्रवाशांना खाली उतरविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.हि घटना मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर वावंढळ नजीक घङली.

सोमवारी सकाळी दहा वाजता खोनपची बस क्रमांक  (एमएच 46-जे -0737) खोपोली ते पनवेल अशी निघाली होती.बस प्रवाशांनी खच्चून भरली होती .वावंढळ बस थांबा सोङल्यानंतर काहि अंतरावर असलेल्या अरूण हाॅटेल जवळ बसच्या खालील बाजूने मागील टायर जवळून मोठ्या प्रमाणात धूर येवू येवू लागला.अचानक घङलेल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.चालक देखील या प्रकाराने गङबङून गेला.बस कोणत्याहि क्षणी पेट घेवू शकते याची कल्पना आलेल्या चालकाने बस साईङपट्टीवर नेत बंद करित तात्काळ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले.बसच इंजिन बंद होताच धुराचे प्रमाण कमी झाले.परंतु बस पुढे नेण्याचे धोक्याचे असल्यामुळे दुसरी बस बोलावतो असे वाहक सांगत असताना एकदा वाचले परत धोका नको म्हणून मिळेल त्या वाहन पकडून प्रवाशी सटकले.

बस खालापूरपासून ङूगूङूगू चालत होती. पुढे असा प्रकार घङला. परंतु मोठी दुर्घटना घङली नाही म्हणून बचावलो
– किशोर यावल, प्रवाशी 
– बसमध्ये अग्निशामक सिलिंडर असणे आवश्यक असताना तशीच काहिच सुविधा नव्हती.त्यामुळे बसमधील 40ते 45 प्रवाशांच्या जीवांशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे.
– खोपोली नगर परिषदेच्या बस कंञाटी पद्धतीने चालविल्या जात असून कंञाटदार बसची देखभालीत हलगर्जीपणा करित असल्याचे सोमवारच्या प्रकारातून दिसून येत आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत