खालापूरात दुचाकिचे तीन अपघात; दोन जण ठार तर दोन गंभीर जखमी!

खालापूर : मनोज कळमकर

खालापूरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकींच्या अपघात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घङली असून पती पत्नी या अपघातात जखमी झाले आहेत.

दुचाकी अपघाताची पहिली घटना सावरोली पेण मार्गावर बाबा स्टिल कारखान्यासमोर घङली. बुधवारी राञी दहा वाजता तांबाटी खालापूर येथे राहणारा अभिजित गणपत थोरवे (वय24) हा दुचाकीवरुन जात असताना वेगात जात असलेल्या कंटेनर क्रमांक एमएच-23-ङब्लू-1075 ने अभिजितच्या दुचाकिला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी अभिजितला स्थानिकानी तात्काळ खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते. परंतु गंभीर जखमी अभिजितला उपचारासाठी पुढे अंबानी येथे नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.अभिजितला ठोकर मारून कंटेनर चालक पळून गेला असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसरा अपघात खोपोली पेण मार्गावर आपटी गावानजीक गुरूवारी सकाळी दहा वाजता घङला.यशवंत साखरे हा त्याचा मिञ विठ्ठल रामजी सावंत (28,रा.मालदिव, खालापूर) याला घेवून मालदिववरून पाली फाटा असा दुचाकीवरून प्रवास करित होता. आपटी गावानजीक पाठीमागून वेगात आलेल्या टेम्पो क्रमांक एमएच-04-एफजे-4177 ने दुचाकिला धडक दिल्याने दुचाकीवर पाठिमागे बसलेले विठ्ठल सावंत जागीच ठार झाले. तर यशवंत साखरे किरकोळ जखमी झाले.अपघातानंतर पळून जाणा-या टेम्पो चालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. टेम्पो चालकाविरोधात विठ्ठल सावंत यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करित आहेत.तिसरा अपघात जुन्या मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर वावंढळ गावाजवळ घङला.दुचाकिला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पती पत्नी(नाव समजले नाही) जखमी झाले असून त्याना खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक अवधुत भुर्के यानी तातङीने चौक ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत