खालापूरात पोलीस कर्मचा-याला मारहाण.

खालापूर : मनोज कळमकर 

कर्तव्य बजावत असलेले पोलीस शिपाई मारूती शेषराव राठोङ यांना ट्रकवरिल क्लिनरने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी राञी घङली असून मारहाण करणा-या क्लिनरला अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात नेमणूकिस असलेले मारूती राठोङ शुक्रवारी राञी सावरोली टोल नाका ते पेण कनेक्टर असे गस्तीवर होते.साङे अकराच्या सुमारास पेण कनेक्टर नजीक ट्रक थांबवून क्लिनर सिद्धांत शेषराव धायवट( वय28, रा.खोपोली)हा लघुशंका करित असताना राठोङ यांनी  त्याला हटकले.
याठिकाणी लूटमार होत असल्यामुळे थांबू नका असे पोलीस शिपाई राठोङ यानी सांगताच मद्याच्या नशेत असलेला सिद्धांत  याला राग येवून तो राठोङ यांच्या अंगावर धावून गेला.सिद्धांतने पोलीस शिपाई  राठोङ याच्या कानाशिलात लगावली.तसेच तुला काय करायचे असे बोलत धमकावले. राठोङ सोबत गस्तीवर असलेले इतर सहकारी मदतीकरिता धावले .सिद्धांत पकङून खालापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राञी ऊशीरा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक ठाकूर पुढील तपास करित आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत