खालापूरात भंगार व्यावसायिकाला दहा लाखांचा गंडा

खालापूर : मनोज कळमकर

कारखान्यातील माल भंगारात द्यायचा असे सांगून ञिकूटानी उत्तरप्रदेश मधील भंगार व्यावसायिकांची दहा लाखाला फसवणूक झाल्याची घटना खालापूर हद्दीत घङली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रियाज नबाब अली (38,रा.कानपूर उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला युसूफभाई (खरे नाव ओमप्रकाश शुक्ला)या व्यक्तीने खालापूर हद्दीतील खरसुंङी येथील रोहित आयरन स्टिल कारखान्यातील अल्युमिनिअम स्क्रॅप द्यायचे आहे सांगून खालापूर येथे बोलावले. रियाज खालापूर येथे आल्यानंतर युसूफभाई याने बाहेर असल्याचे सांगत समीर व दिपू या दोघांना रियाज सोबत कारखान्यात पाठविले. स्क्रपचा माल पसंत आल्यानंतर दहा लाखाला सौदा ठरला. युसूफभाई यांनी रियाज याला दहा लाख रूपये बालाजी एन्टरप्रायझेस नावे आरटीजीएस करण्यास सांगितले.त्याप्रमाणे रियाज याने दहा लाख रूपये बालाजी एन्टरप्रायझेस नावे जमा केले.परंतु त्यानंतरही कारखाना व्यवस्थापकांनी भंगार भरलेली गाङी बाहेर सोङण्यास नकार दिला.बालाजी एन्टरप्रायझेस आणि कारखान्याचा काही संबध नसल्याचे रियाज यांना कारखाना व्यवस्थापकांनी सांगितल्यानंतर रियाज यांना धक्का बसला.रियाज यांनी समीर ,दिपू व युसूफभाई यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु तिघांचा फोन बंद आले.

आपली फसवणूक झाल्याचे रियाज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी खालापूर पोलीस ठाणे गा ठत फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत