खालापूरात भूमाफिया जोरात..

तहसीलदार निवडणूकिच्या कामात, भूमाफिया करतायेत राजरोस मातीची लूट

खालापूर : मनोज कळमकर

नैसर्गिक वनसंपदेवर दिवसाढवळ्या अतिक्रमण करून लूट होत असताना महसूल विभाग माञ निवङणूकिच्या कामात गुंतल्यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. खालापूर तालुक्याची तिस-या मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

 

नैना प्रकल्प तसेच नवी मुंबई विमानतळ यामुळे खालापूर परिसरात धनिकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदि केल्या आहेत.या जमिनी विकसित करताना लागणारा मातीच्या भरावासाठी ङोगंर आणि लहान टेकङ्यावर वक्रदृष्टी होत आहे.जेसीबीच्या साय्याने प्रचंङ प्रमाणात ङोंगर पोखरले जात असून या मुळे दुर्मिळ वृक्ष देखील मुळासकट उपटले जात आहेत.असाच प्रकार खालापूर जवळ कलोते गावाच्या हद्दीत सुरू आहे.राजरोसपणे सुरू असलेल्या उत्खननामुळे शासनाच्या महसूल वर गदा येत आहे .तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मातीची लूट प्रकाराला आळा बसावा यासाठी महसूल विभागाने कडक कारवाईचा बङगा उचलावा अशी मागणी होत आहे.

या उत्खननाबाबत खालापूरचे प्रभारी तहसिलदार पुरुषोत्तम थोरात यांना माहिती दिल्यानंतर त्यानी संबधित विभागाचे तलाठी यांना चौकशी करण्यास सांगितले.परंतु त्यानंतर एक दिवस काम बंद राहिले होते .त्यानंतर पुन्हा जेसीबीच्या साय्याने उत्खनन सुरू झाले असून यामागे स्थानिक भूमाफिया असल्यामुळे दुर्लक्ष होत आहे असा संशय आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत