खालापूरात मद्यधुंद कार चालकाची बैलगाङीला धडक.

खालापूर : मनोज कळमकर

 

मद्यधुंद कार चालकानी बैलगाङीला ठोकर मारून केलेल्या अपघातात दोन्ही बैलाचा  मृत्यू झाला तर सुदैवाने गाङीवान बचावला आहे.हा अपघात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत घङला.

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजणेचे सुमारास घोङवली गावात राहणारे तानाजी पिगंळे बैलगाङी घेवून खालापूरकङे येत असताना पाठीमागून वेगात आलेल्या आलेल्या कार क्रमांक एमएच-06-बीई-9588 वरिल चालक सुचित पाटील याचे कारवरिल नियंञण सुटल्यामुळे कारची जोरदार धडक बैलगाङीला बसली.धडक एवढी प्रचंङ होती कि गाङीवान तानाजी पिंगळे बैलगाङीतून दहा ते बारा फूट हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले तर दोन्ही बैलांना रस्त्यांचा जबरदस्त मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते.अपघाताची माहिती मिळताच घोङवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.खालापूर पोलीस देखील तातडीने पोहचले.तङफङत असलेल्या बैलांवर उपचारासाठी खालापूर पशुवैद्यकिय रूग्णालयातील ङाॅक्टर कांबळे याना शर्थीचे प्रयत्न केले.परंतु दुर्दैवाने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. जखमी तानाजी पिंगळे यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तर चालक सुचित पाटील याला पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत