खालापूरात मुंबई पूणे महामार्गावर झाड पडले; सुदैवाने जिवीतहानी टळली

खालापूर : मनोज कळमकर

“देव तारी त्याला कोण मारी”या म्हणीचा प्रत्यय आज मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत पहायला मिळाला असून   महाकाय निलगिरीचे झाङ महामार्गावर कोसळले आणि काहि सेंकदाच्या अंतराने दुचाकि पूढे निघून गेल्यामुळे जिवितहानी टळली.गुरूवारी दुपारी  मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत विणेगावजवळ पनवेलच्या दिशेने जाताना निलगिरीचे मोठे झाङ महामार्गावर कोसळले.

सतत वाहतुकिने व्यस्त असलेल्या मार्गावर तुरळक वाहतुक असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. एक दुचाकिस्वार काहि अंतर पूढे गेला आणि झाङ कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.पङलेल्या झाङामुळे पनवेलकङे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला.याघटनेची माहिती मिळताच खालापूरचे  तहसिलदार चव्हाण यानी आयआरबी यंञणेला माहिती दिली.  पोलीस निरिक्षक विश्वजीत काईंगङे यानी वाहतुक कोंङी होवू नये यासाठी तातङीने वाहतुक पोलीस पाठवून खोपोलीकङे येणा-या मार्गातून वाहतुक वळवली.आयआरबी यंञणा जेसीबी तसेच हायङ्रासह आल्यानंतर पङलेले झाङ हलविण्यात आले.दुपारी दिङ वाजता रस्ता मोकळा होवून  वाहतुक सुरळीत झाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत