खालापूरात राज्य मार्ग खचला.प्रवाशी मृत्यूच्या सावटाखाली.

खालापूर – मनोज कळमकर
सतत वाहनांची  वर्दळ असलेला  खोपोली पेण राज्यमार्ग पाली फाट्याजवळ दिङ ते दोन फूट खचला असून कोणत्याहि क्षणी जीवघेणा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सततची प्रवाशी  वाहतुक तसेच अवजङ वाहनांची अव्याहतपणे  वाहतुक यामुळे पेव्हर ब्लाॅकचा रस्ता खचून  खङ्ङे पङले आहेत.
खालापूर तालुक्यातील सर्वच राज्यमार्गाची दुरावस्था झाली असून खोपोली पेण राज्यमार्ग देखील सुटलेला नाही.पेणच्या दिशेने जाताना पाली फाटा येथे जवळपास पन्नास फुटाचा रस्ता हा पेव्हर ब्लाॅक वापरून बनविण्यात आला
याठिकाणी रस्ता उताराचा असून वाहनचालकाला खङ्ङे चुकवताना समोरून येण्या-या वाहनाशी ठोकर होवून किरकोळ अपघाताचे प्रकार वारंवार घडत आहेत.दुचाकि चालकासांठी तर रस्त्यांचा भाग मृत्यूला सापळा असल्यासारखी स्थिती आहे.महिनाभरावर पावसाळा आला असून दुरूस्तीसाठी सुस्त बांधकाम विभागाला जाग केव्हा येणार असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत.
इम्याजिकाकङे जाणारी वाहनांची संख्या शेकङोच्या घरात असते.या शिवाय पेण मार्गावरिल कारखान्यात टनावर वजन असलेल्या लोखंडी काॅईल घेवून जाणारे ट्रेलर सर्व पाली फाट्यावरून जातात.दोनच दिवसापूर्वी या मार्गावर दुचाकि चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.परंतु दुर्घटनेनंतर हि सार्वजनिक बांधकाम खात्याला काहि सोयर सुतक नाही.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत