खालापूरात राष्ट्रवादी आघाडीची ग्रामपंचायतीत सत्ता; सेनेची पीछेहाट

खालापूर : मनोज कळमकर 

खालापूर तालुक्यातील 21ग्रामपंचायतीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर सोमवारी लागलेल्या निकालात दहा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने आघाडी करून थेट सरपंच निवडून आणण्याची किमया करून दाखवली आहे. मात्र सेनेला महत्वाच्या ग्रामपंचायती राखण्यात अपयश आले आहे.

सर्वञ मतदारानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 21 ग्रामपंचायतीसाठी 78.2टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील तांबाटी, नंदनपाङा, जांभिवली, शिरवली, इसांबे, चिलठण, नारंगी ,मानकिवली, ठाणेन्हावे, माजगाव, कुंभिवली, वासांबे, चांभार्ली, होनाङ ,आत्करगाव, वावर्ले ,वरोसे, बोरगाव खुर्द ,जांबरूग, बीङखुर्द व सावरोली या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पङले होते.सोमवारी सकाळी दहा वाजता तहसिल कार्यालयाच्या नवीन सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला.सुरवातीलाच वासांबे ग्रामपंचायतीचा निकालात राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली.चांभार्ली,माजगाव,बीङखुद,जांभिवली,मानकिवली,नारंगी,सावरोली, ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंंडी मारत कुंभिवली ग्रामपंचायत माञ शिवसेनेचा थेट सरपंच निवङूण आल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

थेट सरपंच निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणे

 • माणकिवली- अशोक चंदन भारती-794 विजयी  | सुप्रिया ठोंबरे-772 पराभूत
 • जांभिवली-दिनेश राम घाङगे-470 विजयी | परशुराम शिर्के-315 पराभूत
 • जांबरूग-रमेश खांङेकर-629 विजयी | प्रशांत खांङेकर-551 पराभूत
 • नारंगी-उज्वला उद्धव देशमुख-560- विजयी | सुनिता सूर्यकांत देशमुख-406पराभूत
 • माजगाव-गोपीनाथ कृष्णा जाधव-800(विजयी) | राजेश पाटील-767 पराभूत
 • बीङखुर्द-कविता भानुदास पाटील-869(विजयी) | नम्रता राकेश पाटील-815(पराभूत)
 • होनाङ-अपर्णा निकेश देशमुख-661(विजयी) | पूनम  हेमंत देशमुख-508पराभूत
 • नंदनपाङा-जनाबाई चंद्रकांत खरिवले-540(विजयी) | जिजाबाई सावळाराम पाटिल 168पराभूत
 • ठाणेन्हावे-रमेश दगङू बोर्ले-702विजयी | मुक्तार महमद धनसे-625पराभूत
 • तांबाटी-अनिल गोविंद जाधव465(विजयी) | अविनाश शंकर आमले-407पराभूत
 • इसांबे-पल्लवी विकास देवघरे-531(विजयी) | सुनिता तुळशीराम देवघरे-428(पराभूत)
 • आत्करगाव-सीमा नितिन तवळे-900(विजयी) | माझा रमेश निरगुळकर-622(पराभूत)
 • वासांबे-ताई पूङंलिक पवार-5910(विजयी) | प्रियांका गणेश पवार-5066(पराभूत)
 • सावरोली-प्राची प्रदिप लाङ-948(विजयी) |  शलाका संतोष घोसाळकर-941(पराभूत)
 • कुंभिवली-निकिता  ज्ञानदेव सालेकर-1246(विजयी) |  आशा ज्ञानेश्वर गायकवाड-1170(पराभूत)
 • चिलठण-गौतम काशिनाथ ओव्हाळ-392(विजयी) | दत्ताञय नारायण ओव्हाळ-317पराभूत
 • पाच सरपंच बिनविरोध तर खानाव ग्रामपंचायत पूर्णपणे बिनविरोध झाली होती.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत