खालापूरात सरपंचाकडून विवाहितेवर बलात्कार

चिटफंड व्यवसायातून झाली होती ओळख 

खालापूर : मनोज कळमकर 

खोपोली – खालापूरात पोलिसांच्या पत्नीवर सहकारी पोलीस कर्मचाऱ्याने  केलेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच   जांबरूग ग्रामपंचायतीचा सरपंच मंगेश पाटील याने  विवाहितेला धमकावून वारंवार अत्याचार केल्याचे प्रकरण उघङकिस आले आहे.

पीङीत विवाहितेशी चीटफंड बिझनेस मध्ये गुंतवणूक करण्याच्या कारणांवरून सहा महिन्यापूर्वी  ओळख करून  खोपोली, खंडाळा, लोणावळा, व कल्याण इत्यादी ठिकाणी  लाॅजवरून नेवून मंगेशने जबरदस्तीने  संभोग केला  होता.मंगेशने पीङीत विवाहितेचे  अश्लील व्हिडिओ व  फोटो काढून ते फोटो पती, सासरे, व इतर लोकांना दाखवण्याची धमकी देवून वारंवार बलात्कार देखील केला.तोंङ दाबून बुक्क्याचा मार सहन करणाऱ्या  पीङीतेने सहन करण्याच्या पलीकडे गेल्यावर सदरचा प्रकार नव-याला सांगितला.या प्रकाराने पीङीतेच्या पतीला जबर धक्का बसला.पीङीत पत्नीला घेवून त्याने खोपोली पोलीस ठाणे गाठत तक्रार  दिल्यानंतर मंगेश पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सरपंच मंगेश पाटील हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असल्याचं खोपोली पोलिसांनी सांगितले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत