खालापूरात स्पोर्टस बाईकला अपघात ; एक जण ठार

( खालापूर – मनोज कळमकर)
 
खालापूरमध्ये अती वेगात दुचाकिवरून जात असलेल्या नौझेर जमशेद आगा (वय 76,रा.नेपियन्सी रोड़ मुंबई) यांचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई पूणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी खालापूर नजीक घड़ली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौझेर त्याच्या ताब्यातील दुचाकि क्रमांक एम एच -14-ईजी-1904 घेवून मुंबईहून पूण्याच्या दिशेने निघाले होते. सकाळी 9:20 च्या दरम्यान खालापूर हद्दीत घोड़वली फाट्यावर नव्याने बसविण्यात आलेल्या गतिरोधकाचा अंदाज नौझेर यांना न आल्यामुळे वेगात असलेली दुचाकि गतिरोधकावरून काहि फूट ऊड़ाली. अनियंञित झालेली दुचाकि ड़िव्हायड़रला घासत चाळीस ते पन्नास फूट घसरत गेली.
नौझेर यांनी हेल्मेट घातली असताना देखील वेगात आपटल्यामुळे ड़ोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागून जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती खालापूर पोलीस व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे सदस्य हेमंत खवळे,किरण हाड़प घटनास्थळी पोहचले. नौझेर यांना रूग्णवाहिकेतून खालापूर प्राथमिक आरोग्य केद्रांत आणल्यानंतर ड़ाॅक्टरानी त्याना मृत घोषित केले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत