खालापूर : अनैतिक संबधातून पत्नीने केला पतीचा खून

खालापूर : मनोज कळमकर 

अनैतिक संबधातून पत्नीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह राहत असलेल्या फार्म हाऊसमधील आंब्याच्या झाडाखाली पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना खालापूरातील चौक गावाच्या हद्दीत घङली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारती प्रकाश आंद्रे आणि तिला मदत करणाऱ्या साथीदाराला अटक केली आहे.

खालापूर तालुक्यातील चौक गावात मोरबा धरणालगत असलेल्या परब फार्म हाऊसवर देखभालीसाठी हातनोली येथील प्रकाश अनंत आंद्रे हा त्याची पत्नी भारती सोबत राहत होता.चार दिवसापूर्वी प्रकाश दारू पिऊन आल्यानंतर प्रकाशचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये कङाक्याचे भांङण झाले होते.भांङण विकोपाला गेल्यानंतर भारती आणि तिच्या समवेत असलेल्या साथीदाराच्या  साह्याने प्रकाशचा गळा आवळून जीव घेतला. प्रकाश मृत पावल्याची खाञी पटल्यानंतर भारती आणि तिच्या साथीदाराने मिळून फार्महाऊस मधील आंब्याच्या झाडाखाली खङ्ङा खोदून प्रकाशचे मृतदेह पुरले होते.

पोलिसांना या घटनेची चार दिवसानंतर माहिती मिळाली. त्यानंतर फार्महाऊसवर प्रकाश बद्दल चौकशी केली असता भारतीने उङवाउङवीची उत्तरे दिली. मात्र पती प्रकाशचा खून करून त्याचा मृतदेह फार्महाऊस मध्ये पुरून ठेवल्याचे भारतीने तिच्या बहिणीला फोनवरून सांगितले.भारतीच्या बहिणीनेने हि घटना नव-याला सांगितली.भारतीचे सर्व बोलण मोबाईलवर रेकॉर्ड झाले होते. भारतीच्या बहिणीच्या नव-याने पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर भारतीला पोलिसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यानंतर तिने तिच्या साथीदाराला घेवून पतीचा खून केल्याची कबुली दिली.  या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत