खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात;कारखान्यातील रासायनिक प्लास्टिक कचरा उघड्यावर

खालापूर : मनोज कळमकर

खालापूर तालुक्यातील जंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील न्यू बॉम्बे पेपर मिल कारखान्यातील शेकडो टन रासायनिक प्लास्टिक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर नागरिकांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिलाय. जांभिवली गावच्या मागील बाजूस पाच एकर शेतीमध्ये राजरोसपणे कचरा टाकत आहेत. याठिकाणच्या काही अंतरावरच गावासाठी पाणी पुरवठा योजना देखील आहे. त्यामुळे अँसिडयुक्त पाणी शेतात मुरल्यास शेती नापीक होवू शकते तसेच पाणी प्रदुषण होवून येथील अनेक गावांना गावांच्या पाणी योजनेवर परिणाम होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेवून ग्रामस्थांनी खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन पत्र दिले आहे. यावर खालापूर पंचायत समितीचे उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान या कंपनीचा कचरा उचलण्याचा ठेका स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीच घेतला असल्याचे समोर आले आहे. सस्थानिकच अशा प्रकारचे काम करत असल्याचा गंभीर बाब समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित न्यू बॉम्बे पेपर मिल कारखाना आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा माजी सरपंच शशीकांत विचारे यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत