खालापूर तालुक्यातील वॉटरफॉलवर कर्जत-किरवली येथील 29 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू.

कर्जत-अजय गायकवाड

खालापूर तालुक्यातील बोरगाव येथील साईराम वॉटरफॉलवर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या कर्जत तालुक्यातील किरवली येथील 29 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.धीरज भगवान बडेकर असे या मयत तरुणाचे नाव असून किरवली गावावर शोककळा पसरली आहे.


आषाढी महिना संपवून श्रावण महिना सुरू होणार असल्याने आज शेवटचा रविवार-गटारीदिन साजरा करण्यासाठी म्हणून सर्वच कर्जत-खालापूर तालुक्यातील धरणे व वॉटरफॉलवर स्थानिक नागरिकांची तसेच पर्यटकांची एकाच गर्दी उसळली असल्याचे चित्र दिसत होते.खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या साईराम वॉटरफॉलवर कर्जत तालुक्यातील कर्जत- किरवली गावातील चार तरुण मौजमजा करण्यासाठी म्हणून गेले होते.त्यातील धीरज भगवान बडेकर हा तरुण पाण्यात पोहत असताना खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला.तर त्याला वाचवण्यासाठी त्यांच्या अन्य तीन साथीदारांनी देखील पाण्यात पोहत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता धीरज पाण्यात सापडून आला नाही.तर धीरजला वाचवण्यासाठी पाण्यात बुडालेल्या त्याच्या एका साथीदाराला पाण्यातील दगडाचा मार लागल्याने तो देखील जखमी झाल्याचे स्थानिक सांगत होते.

यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने धिराजचा शोध घेण्यास सुरुवात केल्याने काही मिनिटाच्या अंतराने धिराज पाण्यात सापडून आला होता. परंतु वेळ निघून गेल्याने,धीरजच्या नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरून त्याचा मृत्यू झाला होता.यावेळी स्थानिक पोलिस घटने स्थळी हजार झाले होते तर धीरज ला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका साथीदाराला पाण्यात झालेल्या दुखापतीमुळे उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.यावेळी धिराजच्या अशा जाण्याने कर्जत शहरावर शोककळा पसरली होती.
तर आतापर्यंत या परिसरात वॉटरफॉलवर महिन्याभरात तीन जणांना आपले जीव गमवावे लागल्याने, याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरू लागल्याचे समोर येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत