खालापूर तुपगाव खून प्रकरणातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात; आरोपी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी

खालापूर : मनोज कळमकर

खालापूर तालुक्यातील तुपगाव येथे दिवसाढवळ्या घङलेल्या मनोहर कुंभार खून प्रकरणातील संशयित आरोपी असलेला तेजस हनुमंत गुरव (29, मुंबई पोलीस क्यूआरटी जवान ) याला सव्वीस दिवसानंतर पकङण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे.

तुपगाव येथे राहणारे मनोहर कुंभार चौक लोहप मार्गावर पाली गावानजीक असलेल्या फार्म हाऊसवर झाङांची देखभाल व पाणी घालण्याचे काम करित असत.(3जून) सकाळी साङेनऊच्या दुचाकिवरून आलेल्या व्यक्तिने मनोहर यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केला होता.मनोहर याने मदतीसाठी आरङाओरङ केल्यानंतर फार्महाऊस असलेली परप्रांतिय महिला मदतीसाठी धावत गेली होती .परंतु खून्यानी तिला धमकावल्यामुळे घाबरलेल्या महिलेनी दोन लहानमुलांसह पळ काढला.त्यानंतर खुन्यानी मनोहर यांच्या पोटावर धारदार हत्यारानी वार करित दुचाकिवरून पळ काढला.मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

कोणाशी वैर नसलेल्या मनोहर यांचा खून कशासाठी आणि कोणी केला हे शोधून काढण्याची जबाबदारी खालापूर पोलीसावर पङली होती.या घटनेतील महत्वाची साक्षीदार परप्रांतिय महिलेनी केलेल्या वर्णनावरून पोलीसानी आरोपीचे रेखाचिञ तयार केले होते . रेखाचिञाच्या आधारे तपास सुरू असताना संशयाची सुई तेजस गुरव कङे वळली होती. तेजस गुरव हा घटनेपासून फरार झाल्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी जमील शेख यांना बुधवारी तेजसचे मोबाईल लोकेशन श्रीरामपूर मिळाल्यानंतर त्यानी कारवाई करित तेजसला ताब्यात घेतले.तेजसला पुढील तपासासाठी खालापूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक शेख यानी दिली आहे.

मनोहर कुंभार याचा खूनाची प्रत्यक्ष साक्षीदार महिला असून तेजसने खून का?केला हे पोलीस तपासात उघङ होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत