खालापूर पंचायत समितीच्या सभापतींना उपसभापतींच्या कॅबिनचा आधार; सभापतीच्या कॅबिनची दुरावस्था ?

खालापूर : समाधान दिसले

खालापूर पंचायत समिती कार्यालयाचं गेल्या काही महिन्यापासून काम सुरु असल्याने याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या समस्येला तोंड दयावे लागत असून या कामाचा त्रास खुद्द पंचायत समितीच्या सभापतींना सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण की, या कामामुळे सभापतींना बसण्यासाठी स्वतंत्र कँबिन नसल्याने सभापती यांना उपसभापती याच्या कँबिनचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्यामुळे हे इमारतीचं काम केव्हा पुर्ण होईल आणि सभापतींना स्वतंत्र हक्काची कँबीन बसण्यासाठी केव्हा मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. याबाबत खुद्द सभापती अनेकदा अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर करून घेण्याची ताकीत दिली असताना सभापतींच्या सुचनेकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत असल्याने सभापतीची कँबिन दुरावस्थेत सापडली आहे.

खालापूर तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून खालापूर पंचायत समितीच्या सभापतीकडे पाहिले जात असून विदयमान सभापती म्हणून वृषाली ज्ञानेश्वर पाटील ह्या काम पाहात आहे. शांत – संयमी सभापती म्हणून वृषाली पाटील यांची ओळख असून गेल्या काही महिन्यापासून सभापतींना बसण्यासाठी स्वतंत्र कँबिन नसल्याने सभापती वृषाली पाटील यांना उपसभापतीच्या कँबिनचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कारण की गेल्या काही महिन्यापासून पंचायत समिती कार्यालयाच्या दुरुस्ती काम सुरू असल्याने हे काम सुरु असताना सभापतीच्या कँबिनची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत सभापती वृषाली पाटील यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे सांगूनही अद्याप काम पूर्ण न आल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर सभापतीच्या कँबिनची दुरुस्ती काम कधी पूर्ण होणार हे पाहणे सुध्दा औच्छुक्याचे आहे, जर दस्तुरखुद्द सभापतीचे प्रश्न लवकर सुटत नसतील सामान्य नागरिकांचे प्रश्न बाकी लांबच राहतील ?

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत