खालापूर पोलीस पोलीस ठाणे यांच्याकडून दत्तक घेतलेल्या गरजूंना मदत

खालापूर : समाधान दिसले

दिनांक 3 मे रोजी खालापूर पोलीस ठाणे व कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील यांच्या संयुक्त विदयमाने शिरवली आदिवासीवाडी मधील गरजू, निराधार महिला, जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य व मास्क चे वाटप करण्यात आल्याने या जीवनावश्यक साहित्य वाटपाने सर्वाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

खालापूर पोलीस ठाण्याने पाच गावे दत्तक घेऊन समाजात वेगळात आदर्श निर्माण केला असता या उपक्रमाला अनेकांनी मदतीचा हात पोलीस यंत्रणेच्या कामगिरीचे कौतुक केले असून 3 मे रोजी दत्तक घेतलेल्या शिरवली आदिवासीवाडी मध्ये जीवनावश्यक साहित्य वाटपाबरोबर मास्क वाटप केल्याने येथील बांधवांनी पोलीस ठाण्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानले असता शिरवली वाडीतील पोलीस यंत्रणेच्या कामगिरीत मोलाची भूमिका बजावली ती कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील यांनी. दिपक पाटील यांनी उचललेल्या खारीच्या वाट्याचे पोलीस निरिक्षक अनिल विभूते यांनी आभार मानून कौतुक करीत त्याच्या फाऊंडेशन उल्लेखनीय पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलिस उपनिरिक्षक स्वप्नील सावंतदेसाई, कानसा वारणा फाउंडेशन संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, माजी नगरसेवक तथा शेकाप नेते संतोष जंगम, पोलिस कर्मचारी समीर पवार, जगदीश वाघ, प्रतीक्षा म्हात्रे आदीप्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कोरोना काळात असंख्य उद्योग धंदे बंद पडल्याने गोरगरीब जनतेला दोन वेळचे अन्य मिळवताना मोठी कसरत करावी लागत आहे, त्यामुळे अशा सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात मिळावा म्हणून पोलीस प्रशासनाने हाती घेतलेला उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून या उपक्रमात माझ्याकडून छोटाशा हात लागावा म्हणून मी पोलीस प्रशासनाला मदत करण्यास तयार आहे, असे मत दिपक पाटील यांनी व्यक्त केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत