खालापूर प्रेस क्लबकडून बळीराजाचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान

खोपोली: समाधान दिसले 

दरवर्षाप्रमाणे याही वर्षी रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबच्या वतीने खालापूर तालुक्यातील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्कार सन्मान आला .

शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम रायगड प्रेस क्लब गेली अनेकवर्ष राबवित आहे . खालापूर प्रेस क्लबने सावरोली येथील 65 वर्षीय आदर्श शेतकरी बाळाराम नारायण घोंगे व वावोशी – होराळे येथील प्रयोगशील प्रगतीशील शेतकरी अविराज केशव भुरूमकर यांचा आदर्श प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने खालापूर प्रेस क्लबतर्फे गौरविण्यात आले. रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून दरवर्षी जिल्ह्यातील प्रयोगशील, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांची आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड केली जात असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जावून सत्कार करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. यावेळी बाळाराम घोंगे, अविराज भुरूमकर, जनार्दन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून वर्तमान स्थितीत शेती व त्यातील अडचणी आणि सरकारी योजना यांची माहिती दिली. तर शेताच्या बांधावर सत्कार या प्रेस क्लबच्या उपक्रमाचे कौतूक केले. या कार्यक्रमाला पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते मनीष खवळे, सावरोली ग्राम पंचायत सदस्य दिनेश घोंगे, रायगड प्रेस क्लबचे सल्लागार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, खजिनदार मुकूंद बेंबडे, उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, सचिव रवी मोरे, पदाधिकारी समाधान दिसले, अतिष खेडेकर, राज साळुंखे, नवज्योत पिंगळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत