खालापूर शहरातील स्थानिक दुकानदारांना नगरपंचायत प्रशासन देत आहे सावत्रपणाची वागणूक; मनसे नेत्या हेमाताई चिंबुलकर

खालापूर : समाधान दिसले

खालापूर नगरपरिषद मधील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) संध्याकाळी 4 वाजेपर्यत चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश असताना खालापूरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्याची दुकाने नियमांची पायमल्ली करीत सुरू आहेत. एकीकडे स्थानिकांची दुकाने 4 वाजता बंद करण्यासाठी नगरपंचायत अधिकारी व कामगार तत्परतेने काम करीत आहेत तर दुसरीकडे परप्रांतीय दुकानदारांची दुकाने बिनधोकपणे रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतात त्यामुळे “आमच्या महाराष्ट्रात आम्हीच उपरे” अशी परिस्थिती भूमिपुत्रांनी व्यक्त केल्याने याबाबत स्थानिक दुकानदार आक्रमक होत 21 जून रोजी मनसे तालुका संघटीका हेमा चिंबुलकर, सचिव अभिजीत घरत, मनसे सैनिख विजय सावंत हे आक्रमक होत स्थानिक भुमिपुत्रांच्या बाजूने ठाम राहत नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरत लवकरात लवकर बिनधास्त व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

तर नियम तोडणाऱ्या दुकानावर आपण त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनसे वतीने करण्याता आली. नाहीतर सर्व दुकाने चालू ठेवणे बाबत आदेश जारी करावेत ही नम्र विनंती असून तसे न झाल्यास सदर परप्रांतिय दुकाने जर 22 जून पासून चालू राहिली तर मनसे स्टाईल ज्यांच्यावर कारवाई करू व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी हेमा चिंबुलकर, विजय (नानू) सावंत, अभिजित घरत, राजन खडकबाण, महेश लबडे, ओमकार कोटेकर आदीप्रमुखासह दुकानदार उपस्थित होते. तर खालापूर नगरपंचायत प्रशासन स्थानिक व्यापारी व परप्रांतिय व्यापारी वर्गात दुजाभाव करीत असल्याने नगरपंचातयतीच्या कारभाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

“कोरोना काळात नगरपंचायतीचे काम उल्लेखनीय असले तरी नगरपंचायत प्रशासन आम्ही स्थानिक व्यापारी व परप्रांतिय व्यापारी वर्गाला वेगवेगळे नियम लावत असल्याने नगरपंचायत आम्हाला सावत्रपणाची वागणूक देत आहेत. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करीत सर्वाना एकच नियम लावा अशी मागणी करण्यासाठी मनसेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात जाऊन अधिकारी वर्गाला जाब विचारून परप्रांतिय व्यापारी वर्गावर कारवाई न केल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.”
-हेमा चिंबुलकर (मनसे नेत्या)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत