खासदार गोपाळ शेट्टींनी राजीनामा घेतला मागे

मुंबई : रायगड माझा 

उत्‍तर मुंबईचे खासदार आणि भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्‍चन धर्मीयांविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याबद्दल अखेर राजीनामा दिला आहे. गुरूवारी मुंबईतील एका कार्यक्रमात त्‍यांनी ख्रिश्‍चन धर्मीयांना ‘इंग्रज’ म्‍हटले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आज व्‍हायरल झाल्‍याने गोपाळ शेट्टींवर चहुबाजूंकडून टीका करण्‍यात येत होती. तसेच पक्षश्रेष्‍ठींनीही त्‍यांना याप्रकरणी झापल्‍याने ते नाराज असल्‍याची चर्चा होती. त्‍यामुळे ते आज (शुक्रवारी) कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्‍यता दुपारपासूनच वर्तविण्‍यात येत होती. तत्‍पूर्वी ‘मी कोणत्‍याही पद्धतीने पक्षाची बदनामी होईल, असे काही करू इच्छित नाही. पक्षासाठी जे योग्‍य असेल ते करण्‍यासाठी मी तयार आहे.’, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी आज माध्‍यमांना दिली होती.

नेमके काय म्‍हणाले गोपाळ शेट्टी?

– मलाड येथील मालवानीमध्‍ये शिया कबरस्‍थान समितीद्वारे आयोजित कार्यक्रमात शेट्टी म्‍हणाले की, ‘ख्रिश्‍चन धर्मीयांनी भारताच्‍या स्‍वांतत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. ते इंग्रज होते. भारताला हिंदु आणि मुस्लिम यांनी एकत्रित लढून स्‍वातंत्र्य मिळवून दिले आहे.’

वक्‍तव्‍य मागे घ्‍या, पक्षाचे शेट्टींना आदेश
– याबद्दल मुंबई भाजपचे अध्‍यक्ष आशिष शेलार यांनी म्‍हटले आहे की, ‘भाजप कोणत्‍याही प्रकारे शेट्टींच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करत नाही. तसेच पक्षाचे हे अधिकृत वक्‍तव्‍यही नाही. आम्‍ही इतर समुदायांप्रमाणेच ख्रिश्चन धर्मीयांचाही आदर करतो. पक्षातर्फे त्‍यांना आपले वक्‍तव्‍य मागे घेण्‍यास सांगण्‍यात आले होते.’

– दुसरीकडे काँग्रेसनेही गोपाळ शेट्टींवर टीका करताना, हे वक्‍तव्‍य भेदभावपुर्ण आणि भडकाऊ असल्‍याचे म्‍हटले आहे.

दानवेंनी दिला होता सबुरीचा सल्‍ला
– पक्षश्रेष्‍ठींनी झापल्‍याने नाराज झालेल्‍या गोपाळ शेट्टींना राजीनाम्‍याची घाई करू नका, असा सल्‍ला राज्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला होता, अशी माहिती आहे.
– तर आपल्‍या वक्‍तव्‍याबद्दल स्‍पष्‍टीकरण देताना शेट्टींनी म्‍हटले आहे की, ‘माझ्यासाठी भारत व भारतीय सर्वात आधी आहे. माझ्या वक्‍तव्‍याचा चुकीचा अर्थ लावण्‍यात आला. मी समाज जोडण्‍याचे काम करतो. माझ्या काही वक्‍तव्‍यांमुळे एखादा समाज दुखावला असेल तर मला पदावर राहण्‍याचा अधिकार नाही.’
– गोपाळ शेट्टी हे उत्‍तर मुंबईचे खासदार असून 2014 लोकसभा निवडणुकीमध्‍ये त्‍यांनी कॉंग्रेसच्‍या संजय निरूपम यांचा तब्‍बल 4 लाख 56 हजार मतांनी पराभव केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत