खुनाच्या घटनेने खालापूर पुन्हा हादरले!

तूपगावात धारधार शस्त्राने वर करून एकाची हत्या!

खालापूर : मनोज कळमकर 

खालापूर तालुक्यातील चौक हद्दीत चार दिवसात खुनाची दुसरी घटना घङल्यामुळे प्रचंङ खळबळ माजली आहे.  तुपगाव येथील मनोहर कुंभार यांचा  रविवारी दिवसाढवळ्या झालेल्या खुनामुळे खालापुरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चौक तुपगाव येथे राहणारे मनोहर कुंभार हे नेहमीप्रमाणे पाली गावानजीक असलेल्या फार्म हाऊसवर झाङांची देखभाल व पाणी घालण्यासाठी फार्म हाउसवर गेल्यानंतर दुचाकिवरून आलेल्या व्यक्तिने मनोहर यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केला. मनोहर याने मदतीसाठी आरङाओरङ केल्यानंतर फार्महाऊसवर असलेली परप्रांतिय महिला मदतीसाठी धावत गेली. परंतु खून्यानी तिला धामाकावाल्याने त्या घाबरलेल्या महिलेनी तेथून  पळ काढला. त्यानंतर खुन्यानी मनोहर यांच्या पोटावर आणखी धारदार हत्यारानी वार करून दुचाकिवरून पसार झाला.

मनोहर यांच्यावर खुनी हल्ला झाल्याची बातमी पसरल्या नंतर मनोहर यांचे नातेवाईक आणि तुपगाव ग्रामस्थ घटनास्थळी तात्काळ पोहचले. शरीरावर मोठ्या प्रमाणावर वार झाल्याने रक्तस्ञाव होवून मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती  पोलीसाना समजल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी महिलेच्या मदतीने खुन्याचे स्केच काढण्यात आले असून पोलीस सीसी टिव्ही फूटेज देखील तपासत आहेत. मनोहर यांचा कोणाशी वाद नसताना त्यांचा खून कशासाठी झाला या बद्दल नातेवाईक संभ्रमात असून खून्याला पोलिसांनी लवकर अटक करावी अशी मागणी नातेवाईक करित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत