खेळण्याच्या वादावरून ८ वर्षांच्या मुलाची हत्या

दिल्ली : रायगड माझा वृत्त 

मैदानावर कोणी खेळायचं या वादातून १०-१२ वर्षांच्या काही मुलांनी ८ वर्षांच्या अझीमची हत्या केल्याची धक्कादायक घटना दक्षिण दिल्लीतील बेगमपुरा गावात घडली आहे. याप्रकरणी काही मुलांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.

मालवीय नगर जवळील बेगमपुरा गावात एकच मैदान आहे. या मैदानाजवळ एका बाजूला मदरसा आहे तर दुसऱ्या बाजूला काही रहिवासी सोसायटीस आहेत. या मैदानावर ८ वर्षांचा अझीम मदरश्यातील समवयस्क मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी १०-१२ वर्षांच्या मुलांचा एक गट आला आणि त्यांनी अझीम व त्याच्या मित्रांना तिथून जायला सांगितलं. या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यातच झालेल्या मारामारीत अझीमच्या डोक्याला गंभीर जखम झाली. दरम्यान इतर मुलांनी मदरश्यातील वरिष्ठांना कल्पना दिली. लगेच त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत