खोपोलीतील पत्रकार अनिल पाटील यांना रायगड प्रेस क्लबचा प्रतिष्ठित युवा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

अनिल पाटील यांच्या पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांने केले तोंडभरून कौतुक

खोपोली : समाधान दिसले
24 फेब्रुवारी रोजी रायगड प्रेस क्लबचा 14 वा वर्धापन दिन व पत्रकारितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय व महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात गौरव समारंभात खोपोलीतील दैनिक सकाळ व दैनिक सागराचे बातमीदार अनिल पाटील यांना आदर्श युवा पत्रकार हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार गौरव समारंभात प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख, आजतकचे मुंबई विभागाचै संपादक साहिल जोशी , एबीपी माझाच्या अभ्यासू पत्रकार तथा न्यूज अँकर नम्रता वागळे , महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, उप जिल्हाधिकारी इनामदार, मराठी पत्रकार संघ विश्वस्त किरण नाईक, रायगड प्रेस क्लबचे तात्कालिक अध्यक्ष विजय मोकल, विदयमान अध्यक्ष अनिल भोले, रायगड माझाचे मुख्य संपादक संतोष पवार, मिलिंद आष्टीवकर यांच्यासह महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ, रायगड प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

अनिल पाटील यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यावर खालापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, खजिनदार मुकुंद बेंबडे, जेष्ठ सल्लागार भाई ओव्हाल प्रविण जाधव, सदस्य रवि मोरे, अतिष खेडेकर, नवज्योत पिंगळे, राज साळुंके यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर आदी प्रमुखांसह खोपोली – खालापुरातील पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शासकीय अधिकाऱ्यांनी पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत