खोपोलीत प्रधानमंत्री अश्वासित प्रगती योजने अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती अभियान

खोपोली: समाधान दिसले
30 जानेवारी कुष्ठरोग दिन आणि महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रधानमंत्री अश्वासित प्रगती योजने अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती अभियानासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.आनिलकुमार शहा यांनी बोलताना असे मत व्यक्त केले की जगात अंदाजे 2 लाख रुग्ण हे कुष्ठरोगाचे असून त्यापैकी एकट्या भारतात 50% आहेत. या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून देशातील कुष्ठरोगाचे रुग्ण शोधून काढुन त्याच्या लक्षणाच्या आधारे त्याचावर उपचार करून देश कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपण सर्वाचा सहभाग खूप महत्त्वाचा असून या चळवळीचा आपण सर्व भाग होऊन कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी पुढे येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत