खोपोली – पाली मार्गावरील खुरावले गावाजवळ रस्ता खचला, वाहतूक बंद

पाली : विनोद भोईर 

खोपोली ते वाकण  फाट्या पर्यंतच्या रस्त्यावरील खुरावले गावाजवळ रस्ता खचून वाहून गेलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खंडित झालीये. सुदैवाने या मार्गावर वाहतूक कमी असल्याने मोठा अपघात टळला. वाकण ते पाली फाटा हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडी ने हाती घेतले आहे. पावसाळा सुरु झाल्याने वाहतुकीची आणि सुरक्षितेच्या बाबतीत ठेकेदार कडुन कोणतीही काळजी घेतली गेली नसल्याचे या घटनेवरून दिसून येतंय. महामार्गाचे काम करताना पाणी वाहून नेणाऱ्या जुन्या मोऱ्या तशाच ठेवून नवीन मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह हा जुन्याच मोऱ्यांमधून जात असल्याने येथील रास्ता खचला असल्याचे स्थानिक बोलत आहेत.

हि घटना घडल्यानंतर या मार्गावरील वाहतूक खंडित झाली आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आलीय. लहान गाड्या उन्हेरे मार्गे तर मोठ्या गाड्या ह्या वाकण वरून पेणमार्गे वळवण्यात आल्यात.  लहान गाड्या उन्हेरे मार्गे तर मोठ्या गाड्या ह्या वाकण वरून पेणमार्गे वळवण्यात आल्यात. रस्ता वाहून गेल्याने ती मोरी टाकण्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि पर्यायी रस्ता केला तरी सुद्धा पाण्याचा प्रवाहात हा रस्ता वाहनांसाठी धोकेदायक ठरू शकतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत