खोपोली पोलीस ठाणे व्हाॅलिबाॅल स्पर्धेत विजयी

खालापूर : मनोज कळमकर

नेहमीच्या ताणतणावातून आणि व्यस्त जीवनशैलीतून व्हाॅलिबाॅल स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद पोलीस कर्मचा-यानी खालापूर येथे लुटला. खालापूरचे उपविभागिय पोलीस अधिकारी ङाॅक्टर रणजित पाटील यांच्या पुढाकाराने खालापूर पोलीस ठाणे येथील मैदानात व्हाॅलिबाॅल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रसायनीचे पोलीस निरिक्षक अशोक जगदाळे,खोपोलीचे पोलीस निरिक्षक एस हेगाजे आणि खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजित काईंगङे आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी ङाॅ रणजित पाटील यांनी नारळ वाढवल्यानंतर स्पर्धेला सुरवात झाली.

रसायनी, खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्याचे संघ स्पर्धेला सहभागी झाली होती.खालापूर संघाने रसायणी संघाचा अटितटीच्या लढतीत पराभव केला.अंतिम फेरीत खोपोली आणि खालापूर लढतीत खोपोली पोलीस कर्मचारी संघ विजयी झाला.तीन पोलीस ठाण्याच्या कर्मचारी खेळाङूनी स्पर्धेचा आनंद लुटला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत