गणपतीपुळे समुद्रात बुडणा-या पर्यटकाला जीवरक्षकांना वाचवण्यात यश

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त

गणपतीपुळे समुद्रात बुडणा-या पर्यटकाला जीवरक्षकांना वाचवण्यात यश आले. विक्रोळी, मुंबई येथील चंद्रकांत भागवत असे या पर्यटकाचे नाव आहे.

चंद्रकांत आज गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आला होता..त्याला समुद्रात जाणाचा मोह आवरता आला नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. किना-यावर असणा-या जीवरक्षकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ चंद्रकांत यांना वाचवण्यासाठी.हालचाली सुरु केल्या. अखेर चंद्रकांत यांना वाचवण्यात यश आले. रोहित चव्हाण, अनिकेत मयेकर, उमेश म्हादये, ओंकार गावणकर. विशाल निंबरे, अनिकेत चव्हाण व प्रमोद डोर्लेकर या सर्वांनी मिळून त्याला सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे..

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत