गणपती सणाचे औचित्य साधून शाळा झाली डिजिटल!    

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा केंद्रातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिराठी गौरी – गणपती सणाचे औचित्य साधून  नवयुवक विकास संघटना चिराठी यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून डिजिटल झाली.
यावेळी नवयुवक विकास संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत चव्हाण, उपाध्यक्ष शैलेश शेडगे,सचिव संकेश मोरे, सहसचिव नितिन नाचरे, खजिनदार प्रदिप मोरे सहखजिनदार चेतन मोरे , संपर्क प्रमुख नितिन मोहिते सहसंपर्क अभिषेक मोरे सल्लागार विनोद वाघे,विकास मांडवकर, मंगेश चव्हाण ,सुभाष  मांडवकर मंदेश मोरे वरिष्ठ गोविंद नाचरे,संतोष मांडवकर, सहदेव मांडवकर लक्ष्मण मांडवकर, सुनिल शेडगे शाळेचे मुख्याध्यापक श्री महादेव निगुडकर गुरूजी, पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे साधन व्याक्ति दिपक पाटिल सर, उपक्रमशिल शिक्षक बेटकर सर  नगरसेविका शितल मांडवकर आंगणवाडी सेविका शानिका उध्दरकर मदतनिस प्रमिला चव्हाण ,शा व्य समिती अध्यक्ष मोनिका मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे सचिव यांनी सांगितले की गेली अनेक वर्ष कला ,क्रिडा, सामाजिक , सांस्कृतिक उल्लेखनिय कार्य नवयुवक विकास संघटना चिराठी करत आहे.तरी या चालु वर्षी शैक्षणिक कार्यक्रम म्हणून राजिप चिराठी शालेला ७० हजारू रूपयेचा देणगी स्वरूपात खर्च करून डिजिटल शाळेसाठी भरिव आशी मदत करून शाळेतील बालकांना आनंददायी पध्दतीने शिक्षण घेता यावे यासाठी लोकसहभागातून प्रोजेक्टर , संगणक संच, स्पिकर, पेन्ड्रव्ह आदी साहित्य देऊन नवयुवक विकास  चिराठी संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थित डिजिटल शाळेचे भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी दिपक पाटिल सर, जयसिंग बेटकर सर, आंगणवाडी सेविका उध्दरकर मँडम यांनी मनोगत व्यक्त केले. या डिजिटल कार्यक्रमासाठी  पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेडगे सर,विस्तार अधिकारी आडे सर, केंद्रप्रमुख ठाकुर सर आदींनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेश मोरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन शैलेश शेडगे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, पालक , विद्यार्थी जातिने हजर होते.
Attachments area
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत