गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील : चंद्रकांत पाटील

पेण : रायगड माझा वृत्त

गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे भरले जातील तसेच इंदापूर ते झारप हा रस्ता डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल आणि हा रस्ता रस्ते सिमेंट काँक्रेटचा असेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रायगडमध्ये खड्ड्यांच्या पाहणी दौऱ्यात दिली. 

कंत्राटदाराची दिवाळखोरी आणि भूसंपादन काम यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचं त्यांनी म्हटलंय. कर्नाळा खिंडीत पर्यावरण खात्याकडून परवानगीला विलंब होत आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होणे आणि लगेच त्यावर मलमपट्टी करणे हा क्रम वर्षांवानुवर्षे चालू आहे. कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने कोकणातील रस्त्यांवर खड्डे पडले आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या गणेशोत्सवापूर्वी हे सर्व खड्डे भरले जातील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान मुंबई  गोवा महामार्गावरील इंदापूर ते झारप हा रस्ता डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल तसेच हे रस्ते सिमेंट काँक्रेटचे असतील असे त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीदरम्यान सांगितले. मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीचे काम समाधानकारक असल्याचा दावा करत आज रस्ते विकास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतलीय. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडण्या मागचीही कारणंही पाटलांनी दिली.

मुंबई गोवा या महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात  चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार निरंजन डावखरे  सामील झाले होते.रायगड माझासाठी सुनील पाटील पेण

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत