गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल फ्री

मुंबई : रायगड माझा वृत्त 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. टोल माफीसंदर्भात कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड यांनी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पत्र  देखील दिले होते.

या निर्णयानुसार, कोकणात जाण्यासाठी 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसूली केली जाणार नाही. याशिवाय कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेशभक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे.

टोलमाफी केल्यामुळे गाड्या टोलनाक्यांवर थांबणार नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यताही कमी असणार आहे.गेल्यावर्षीही सरकारने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांसाठी अशाचप्रकारे टोल माफी केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत