गणेश नाईकांना महाविकास आघाडीचे आव्हान 

महाराष्ट्र News 24 वृत्त

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या फॉर्मूल्यावर लढवली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशीकांत शिंदे यांनी सांगितले.

 

After Udayan Raje, now Ganesh Naik on the target of Pawar; The responsibility entrusted to Shashikant Shinde | उदयनराजेंनंतर आता पवारांचे टार्गेट गणेश नाईक ? शशिकांत शिंदेंवर सोपविली जबाबदारी

नवी मुंबई हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. गणेश नाईक यांनी आता पर्यंत या महानगरावर एकहाती वर्चस्व राखले. राष्ट्रवादीने देखील त्यांना पूर्णपणे मोकळीक दिली होती .सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात असतानाही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी विकासाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला .अशोक गावडे आणि सपना गावडे वगळता सर्व नगरसेवक गणेश नाईक यांच्यासोबत गेले. मात्र विधानसभेनंतर राज्याचे राजकारण पूर्णपणे बदलून गेले. गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला दणका देण्याची इच्छा  बाळगून असलेल्या शिवसेनेला आता राष्ट्रवादीची मदत होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईची आगामी निवडणूक महाविक आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता राष्टवादीचे नवी मुंबई प्रभारी शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची बैठक झाली. या बैठकीत प्रभाग रचना रद्द करावी अशी बहुतांश स्थानिक नेत्यांनी केलीय. याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बदलत्या राजकीय आव्हानाचा गणेश नाईक कसा मुकाबला करतात हे आगामी काळात स्पष्ट होईल.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत